We want you to stitch on paper
उषासो डॉट कॉमवर लॉग इन करा आणि आपणास दिसेल की आपण ‘शिलाईकाम कशा प्रकारे शिकावे ‘ याविषयी शोधू शकणाऱ्या साइट्सपेक्षा ही साइट बरीचशी वेगळी आहे. सर्वप्रथम आम्ही ९ वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये सर्व धडे आणि प्रकल्प प्रदान करतो. परंतु अधिक महत्त्वाचे म्हणजे आम्ही प्रत्येक धडा आणि प्रकल्पाची काळजीपूर्वक योजना आखली आहे आणि आपल्याला योग्य कौशल्य प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेली नेमकी माहिती निश्चित केली आहे.
आता आपण प्रथम पाठ शिकू या. यात आपणास शिवणकाम शिकविण्यात आलेले नाही. त्याऐवजी हा पाठ आपले उषा शिलाई मशीन योग्य प्रकारे कसे सेट करावे याविषयी स्पष्ट आणि सोपे निर्देश देते. आपण आपल्या मशीनला थ्रेड कसे करावे, नीडल कशा प्रकारे बदलावी, बॉबिनला स्पूल कसे करावे, दोऱ्याचे टेंशन कशा प्रकारे ऍडजस्ट करावे आणि आपले काम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी लागणारा इतर सर्व लहान तपशील याविषयी आपण शिकाल.
पाठ क्रमांक दोनमध्ये देखील शिवणकाम नाही!
पुढील पाठात जा आणि आपण अजूनही शिवणकाम सुरू करणार नाही. येथे आपण मशीनवर आपले हात स्थिर होऊ देणार आणि मशीनवर संपूर्ण नियंत्रण मिळवाल. हे करण्यासाठी आपल्यास मुद्रित करण्यासाठी आमच्याकडे डाउनलोड करण्यायोग्य पीडीएफ आहेत. ही पत्रके, खरोखर कौशल्य मिळवण्याची किल्ली आहेत. आपल्याला सराव करण्यासाठी प्रत्येक पृष्ठावर एक भिन्न पाठ आहे.
पहिला पाठ आपण सरळ रेषेत शिवण्यासाठी सांगतो. आपण मशीनवर कोणत्याही धाग्याशिवाय, कागद वापरून हे करू शकता. मग आपण पुढे पॅटर्न्सकडे जाता जे अधिक जटिल असतात. काहींचे वेगवेगळ्या कोनांवर कोपरे असतात, तर इतरांचे समकेंद्री वर्तुळे असतात. या अभ्यासाचा हेतू, आपणास नीडल कशी हलते ते दाखविणे, आपल्याला नियंत्रण आणि आपल्या स्टिचेचसह अचूक राहण्याची क्षमता मिळवून देणे हा आहे.
कागदाच्या जुन्या पत्रकांचा पुनर्वापर करा.
एकदा आपण मुद्रित केलेल्या धड्यांना वाचले की आपण जवळपास पडलेल्या कागदाच्या कोणत्याही पत्रकाचा वापर करण्यास सुरुवात करू शकता. आपण जुने वृत्तपत्र, मासिकांची किंवा जुन्या प्रिंटआउट्सची पृष्ठे वापरू शकता. आपण डाउनलोड्सवरून जे काही शिकलात केवळ त्याचे अनुसरण करा आणि आपण शक्य तितके अधिक प्रवीण होईपर्यंत सराव चालू ठेवा.
आपण कापडाचा वापर केव्हा सुरु कराल?
एकदा आपण भरपूर सराव केला आणि आपल्या कौशल्यांविषयी आपणामध्ये विश्वास निर्माण झाला की आपण एखाद्या कापडाचा वापर सुरु शकता. आम्ही सुता (कॉटन)च्या कापडाची शिफारस करतो कारण ते सर्वात चांगले आणि तुलनेने स्वस्त आहे. आपण सामग्रीच्या जुन्या तुकड्यांवर किंवा अशा कपड्यांवर देखील अभ्यास केला पाहिजे ज्यांना आपण आता घालत नाहीत.
यामुळे आपल्याला नीडल कापडाच्या वीणमधून कशी वर खाली जाते याचा अनुभव येईल, आपणास स्टिचची लांबी ऍडजस्ट करता येऊ शकेल आणि आपण स्टिचच्या विभिन्न पॅटर्न्सला अजमावता येईल.
सरावाने परिपूर्णता येते
कोणत्याही कारीगिरीची किल्ली सराव करत राहणे होय. आपण जितकी अधिक शिलाई कराल, तितके चांगले नियंत्रण आपण आपल्या उषा शिलाई मशीनवर प्राप्त करू शकाल. तुम्ही कदाचित पाहिले असेल की टेलर मास्टरजीस त्यांच्या मशीनला कधी थांबवायचे हे माहित असते जेणेकरून ते एक स्टिच देखील वाया घालवीत नाहीत. काठ शिवताना ते किती आश्चर्यकारकपणे आणि व्यवस्थितपणे काम करतात. आपण देखील कौशल्याचा हा स्तर प्राप्त करू शकता, आपल्याला केवळ इतकेच करायचे आहे की प्रथम पेपरवर अभ्यास करावा आणि नंतर कापडाकडे वळावे.
सराव करणे एक मजेदार खेळ होऊ द्या.
एकदा आपण मूलभूत तत्वे शिकून घेतली आणि पुढील स्तरावर जाण्यासाठी आपणामध्ये विश्वास निर्माण झाला की आपण काही साधे खेळ खेळून बघू शकता. एखाद्या मासिकातून चित्रे कापून घ्या आणि शिलाईमशीनचा वापर करून त्यांना ट्रेस करण्याचा प्रयत्न करा. सर्व आकारांमध्ये भिन्न रूपे तयार करा. उषासो डॉट कॉममधील पाठात दिलेल्या निर्देशांचे नेहमी पालन करण्याचे लक्षात ठेवा. आपणास असे लक्षात येईल की शिलाईची मूळ मूलभूत तत्वे तीच आहेत, बदल झाला आहे तो केवळ ऍप्लिकेशनमध्ये.
प्रकल्पाकडे वळणे
आम्हाला शेअर करण्याची इच्छा असलेली दुसरी सूचना म्हणजे आपणास जेव्हा प्रकल्प सुरु करण्याची इच्छा आहे, तेव्हा त्याच पद्धतीचा पाठपुरावा करा. व्हिडिओ पहा आणि नंतर निर्देशांचे अनुसरण करा परंतु कापडाच्या ऐवजी पेपर वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्या कपडाची बचत होईल आणि प्रत्येक चरणात नक्की काय प्राप्त होईल हे समजून घेण्यात देखील आपली मदत होईल.
उषासो डॉट कॉमने सर्व पाठ आणि प्रकल्प एकत्रितपणे काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. आपल्याला असे दिसून येईल की आपण काही पाठांचा अभ्यास केल्यानंतर एक प्रकल्प समोर येतो. खरोखर काहीतरी तयार करताना आपण जे काही शिकलात त्याचा वापर करण्यात मदत होण्यासाठी हा प्रकल्प येथे देण्यात आला आहे. यामुळे आपण मनोरंजक गोष्टी जसे की बुकमार्क, बॅग्ज आणि अगदी फॅशनेबल सामग्रीला आकार देऊ शकता. म्हणून कृपया धीर धरा आणि पाठांचा योग्य क्रमाने अभ्यास करा.
आपण काही अद्भुत प्रकल्प केले असल्यास किंवा काहीतरी तयार करण्यासाठी आपल्या कौशल्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला असल्यास, कृपया त्यांना आमच्या सोशल नेटवर्कवर आमच्याशी शेअर करा. पृष्ठाच्या तळाशी असलेल्या उषा सो शोशल पृष्ठांवर आपणास दुवे आढळतील.