8 Sewing Tips you should know before you start
शिवणकाम ही एक अशी हस्तकला आहे जी अत्यंत आनंद आणि सुख देते. त्यामुळे आपण क्रीएटीव्ह होऊ शकता आणि आणि बऱ्याच मार्गांनी स्वत: चे विचार मांडू शकता. आपण कपड्यांना डिझाइन करू शकता, आपल्या घरासाठी वस्तू बनविताना कपड्यांवर प्रयोग करू शकता किंवा अन्यथा ज्या कापडास आणि सामग्रीला फेकून दिले गेले असते त्यांना चांगल्या प्रकारे वापरण्याचे मार्ग शोधू शकता.
आता जर आपण पूर्वी कधीही शिलाई मशीन वापरले नसेल किंवा त्यास आताच वापरण्यास सुरुवात केलेली असेल, तर आपणास काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. प्रथम आपल्याला तयारी करावी लागेल आणि सुरुवात करण्यासाठी योग्य पाठ शोधावे लागतील. असे पाठ ज्यांना आपणास माहितीपूर्ण आणि शैक्षणिक मार्गाने प्रत्येक चरणाचा अभ्यास करता यावा म्हणून तयार केले गेले आहे. उषा सो डॉट कॉममध्ये आपल्यासाठी असेच पाठ आहेत. एक कुशल कारागीर बनण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक चरणास एका व्हिडिओमध्ये रुपांतरीत केले गेले आहे. आपण मूलभूत गोष्टींसह सुरुवात करून सरळ रेषांमध्ये कशा प्रकारे शिलाई करायची ते शिकाल आणि मग पुढे जाऊन वळणदार, कोपरे असलेली शिलाई आणि नंतर इतर सर्व प्रकारची शिलाई शिकाल. आपण जे शिकलात त्याची उजळणी होण्यासाठी त्याचा व्यावहारिक उपयोग करण्यासाठी, या पाठांच्या अधूनमधून काही प्रकल्प जोडले गेले आहेत. त्यांच्यामुळे आपल्या कौशल्यांना उजाळा मिळतो आणि आपल्या नवीन क्षमतांचे प्रदर्शन केले जाते. त्याचवेळी आपणास प्रत्यक्षात काहीतरी तयार केल्याचा आनंद मिळतो.
आता येथे काही अशा छान सूचना आहेत, ज्या सर्वात कुशल आणि अनुभवी व्यक्तीला देखील माहित असणे आवश्यक आहे.
आपली मशीन योग्यरित्या थ्रेड करा
जरी बहुतांश उषा सिलाई मशीन्समध्ये स्वयंचलित थ्रेडिंग फंक्शन असले, तरी यास अचूकपणे कसे आणि केव्हा केले जाते ते माहित करून घेणे ही एक चांगली बाब आहे. ‘आपल्या मशीनला थ्रेड कसे करावे‘ हा व्हिडिओ पहा आणि निर्देशांचे अनुसरण करा. येथे प्रत्येक चरणास तपशीलवार समजावून सांगितले आहे आणि आपण योग्य पद्धतीने कसे करावे ते समजते. आम्ही असे सुचवितो की आपण वास्तविक शिलाई सुरू करण्यापूर्वी काही वेळा याचा सराव करावा.
पिन वापरताना संकोच करू नका
जेव्हा आपण हेम शिवत असता किंवा बाही जोडत असता, तेव्हा कापडा टॅक अप करण्यासाठी पिन्सचा वापर करा. आता येथे लाजू नका, खूप जास्त पिन्स अशी कोणतीही गोष्ट नाही कापडास जागेवर ठेवण्यासाठी आवश्यक तितक्या पिन्सचा वापर करा. अशा प्रकारे आपण सामग्रीला सतत लाइन अप करण्याची चिंता न करता आपण व्यवस्थित आणि साफ फिनिशची खात्री करू शकता. जेव्हा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचता तेव्हा पिन्स काढून घ्या आणि त्यांना पुन्हा पिन कुशनमध्ये परत ठेवा.
आपल्या पिनसाठी एक चुंबक.
आम्ही पिन्स आणि नीडल्सच्या विषयावर चर्चा करत असताना आम्ही एक उपयुक्त युक्ती शिकलो आहोत ती म्हणजे आपल्या सोईंग कीटमध्ये सर्व पिन्स आणि नीडल्ससह एक चुंबक ठेवणे. जर आपण पिन कूशन वापरत असाल, तर त्यामध्येही एखादे चुंबक शिवू शकता. यामुळे जर कधी आपणाकडून कधी बॉक्स पडला, तर पिन्सला इकडे तिकडे विखुरण्यापासून रोखले जाईल. पिन्स चुंबकास चिकटून राहतील आणि ते सफाई करणे सोपे आणि जलद होईल.
कामाच्या ठिकाणी प्रकाश, भरपूर प्रकाश असू द्या.
भरपूर प्रकाश असलेल्या ठिकाणी काम करणे नेहमीच उचित असते. शिलाई करत असताना तर याची फारच गरज असते. ही हस्तकला बारीक सारीक तपशीलाविषयी आहे आणि आपण नेमके काय करत आहात आणि नीडल कशी खाली वर होत आहे हे दिसणे महत्वाचे आहे. एक लहान, तेजस्वी रीडिंग लॅम्प एक चांगली कल्पना आहे. आपण आपल्या डोळ्यांमध्ये चमक न घेता बीमला आपल्या कार्यक्षेत्रावर निर्देशित करू शकता.
दोऱ्याचे टेंशन तपासणे
बहुतांश नवशिके लोक आणि काही अनुभवी लोक सुद्धा एक चूक करतात ती म्हणजे, शिलाईकाम सुरु करण्यापूर्वी ते धाग्याचे टेंशन तपासण्याचे विसरून जातात. आता प्रत्येक कापडची एक वेगळी वीण असते आणि याचा अर्थ आपल्याला कापडाशी जुळण्यासाठी आपले मशीन सेट करणे आवश्यक असते. येथेच दोऱ्याच्या टेंशनचा संबंध येतो. दोरा खूप ढिला असेल तर स्टिचेस अव्यवस्थित दिसतील आणि तो ताणलेला असेल तर कापड गोळा होईल. म्हणून सुरुवात करण्यापूर्वी तपासा. नेहमी!
सुरुवात करण्यापूर्वी धाग्याची मात्रा तपासा.
एखाद्या व्यक्तीने शिवणकामास सुरवात करणे आणि एखाद्या प्रकल्पच्या मध्यभागी धागा संपणे असामान्य बाब नाही. हे आपणा सर्वांसोबत कधीकधी घडले आहे. त्यामुळे नेहमीच स्पूल आणि बॉबिन पूर्ण भरलेले असल्याचे तपासा. आणि खात्री करा की आपल्याकडे समान रंगचा आणि प्रकाराचा पुरेसा धागा आहे. काम मध्येच थांबल्यामुळे आपली ताल (रिदम) बिघडेल आणि ही बाब त्रासदायक होईल.
दोनदा माप घ्या, एकदाच कापा
आपली मापे परिपूर्ण घ्या, ही उत्तम फिनिशचे किल्ली आहे. हे करण्यासाठी आपल्याला आपले कापड कमीतकमी दोनदा मोजण्याची आणि नंतर कापणी करण्याची आवश्यकता आहे. असे केल्याचा अर्थ असा की आपण कधीही खूप जास्त किंवा खूप कमी कापड कापणार नाही. लक्षात घ्या की आपण एकदा कापड कापल्यानंतर त्यास पुन्हा पहिल्यासारखे करता येणार नाही.
अभ्यास करण्यासाठी कापडचे तुकडे जतन करा.
आपले कापडाचे सर्व स्क्रॅप्स जतन करा आणि शिलाईचा अभ्यास करण्यासाठी त्यांचा वापर करा. निपुण बनण्यासाठी ही एक महत्वाची गोष्ट आहे. आपण स्टिचच्या प्रकारांसह प्रयोग करू शकता (बहुतांश उषा मशीन आपल्याला भरपूर पर्याय देतात) आणि स्टिचच्या वेगवेगळ्या लांबींचा वापर कसा करावा हे समजून घ्या. आपण जे काही शिकला आहात त्या सर्व गोष्टींचा नियमित सराव करा, आपण शिलाईकामात प्रवीण झाल्यानंतर देखील. सरळ रेषेत शिवणकाम करणे, कोपऱ्यांच्या बाजूने शिवणे, हेमिंग करणे इ. अशा मुलभूत बाबींचा नेहमीच वापर करावा लागतो, त्यामुळे आपण जितके कुशल असाल तितकीच आपली निर्मिती चांगली दिसेल.
शिलाईकामाची कला समजून घेण्यात आणि शिकण्यात मदत करण्यासाठी उषासो.कॉम ने पाठांचा आणि प्रकल्पांचा एक नियोजनबद्ध संच एकत्र केला आहे. व्हिडीओ पहा आणि निर्देशांचे पालन करा आणि आपल्या उषा शिलाई मशीनपासून त्वरीत जास्तीत जास्त शिकायला मिळेल. सराव करणे आणि काही अधिक अभ्यास करणे हीच यशाची किल्ली आहे.
जेव्हा आपण प्रकल्प तयार करण्यास सुरुवात करता, तेव्हा आपल्या निर्मितीस आमच्या कोणत्याही पृष्ठांवर कोणत्याही सोशल नेटवर्कवर शेअर करा. आपल्यासाठी खालील लिंक्स दिलेल्या आहेत.